कोंडिवडे शाळेतील मुलांनी लिहिली पंतप्रधानांना पत्रे
कोंडिवडे:
आंदर मावळ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. प्राचीनता , श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता या चारही निकषावर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे येथील ५० विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहून विनंती केली. शाळेतील शिक्षक किशोर शेळके, शिक्षिका शिल्पा बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती सांगितली, शाळेचे मुख्याध्यापक तानाजी भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे तील असणारे विद्यार्थी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, पत्रामध्ये असे म्हटले आहे, आम्ही मराठी भाषेमधून शिक्षण घेत आहोत आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे सिद्धी शंकर तळावडे, व साहिल सुभाष खरमारे यांनी असे पत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!