झोपडी जळालेल्या पाटणच्या आदिवासी कुटुंबाला किनाराच्या मदतीचा हात
पाटण:
मागील आठवड्यात वणवा लागून पाटण येथील लक्ष्मण सोनू वाघमारे या आदिवासी बांधवाची झोपडी जळून खाक झाली होती. ही घटना मावळमित्र न्यूज सह अन्य प्रसार माध्यमांनी प्रसिध्द केली होती.याची दखल घेत कामशेत जवळील किनारा वृद्ध आश्रमने वाघमारे कुटूंबियांना मदतीचा हात दिला.
झोपडीला लागलेल्या आगीत झोपडीतील सर्व संसारउपयोगी वस्तू तसेच कागदपत्रे जळाल्याने आता त्यांच्याकडे काहीच राहिले नव्हते. अश्या परिस्थितीत कामशेत जवळील आहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रम संस्थेने या कुटुंबाला दिड ते दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य इतर वापराच्या सर्व वस्तू तसेच संसार उपयोगी भांडी, कपडे, ब्लॅकेट देऊन मदतीचा आधार दिला आहे. यावेळी किनारा वृध्दाश्रमाच्या प्रिती वैद्य, मयुरेश लेले, उमेश शक्करवार व पाटण बोरज ग्रामपंचायत सरपंच प्रविण तिकोणे उपस्थित होते. तसेच पुढे वृद्धाश्रम किनारा व पाटण ग्रामपंचायतीकडून मदत करणार असल्याचे सांगितले आहे.
या मदतीने काहीसा हातभार लागलेल्या या आदिवासी कुटूंबाला अधिक मदतची गरज आहे.शिवाय जाणीवपूर्वक वणवा लावणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमी करीत आहेत.

error: Content is protected !!