
भोयरे शाळेतील आदर्श शिक्षक तानाजी शिंदे यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर…
वडगाव मावळ:
पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मावळ तालुक्यातील भोयरे शाळेतील पदवीधर शिक्षक तानाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते त्यांना पुणे येथे गौरवण्यात येणार आहे.तानाजी शिंदे यांचे मूळ गाव मावळ तालुक्यातील इंगळूण हे असून ते उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून सुपरिचित आहेत.सलग पाच वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत आहे.भजन स्पर्धेतही भोयरे शाळा नेहमी अव्वल क्रमांकावर राहिलेली आहे.
आतापर्यंत त्यांना आंदर मावळ भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार,पंचायत समिती मावळचा आदर्श शिक्षक व क्रीडाशिक्षक पुरस्कार,शिवसेना पक्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले आहेत.समाजसहभागातून त्यांनी शाळेला सुमारे पंचवीस लक्ष रुपयांपर्यंतची मदत प्राप्त केली आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी धडपडणारा शिक्षक म्हणून त्यांची आंदर मावळात ख्याती असून त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
- रवि ठाकर एक जिवलग मित्र
- हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- हिंदू उत्सव समिती व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास मदत
- सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण



