वाचनवेड संस्थेच्या वतीने आंदर मावळातील २४ शाळांना अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप.
देहू येथील अभंग प्रतिष्ठाणचा पुढाकार
भोयरे:
पुणे येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आंदर मावळातील २४ जिल्हा परिषद शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.कोंडिवड्यापासून तर कळकराईपर्यंतच्या सर्व शाळांचा यात समावेश आहे.
भोयरे येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमप्रसंगी माजी उपनगराध्य गणेश काकडे,गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,सरपंच बळीराम भोईरकर,अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे,राजाराम करवंदे,कृष्णा भांगरे,सुनिल माकर,सागर मोरे,सचिन कुंभार,सुरेश गाडे,चंदन सुतार,प्रा.विक्रम भोईटे,प्रा.विकास कंद,अजिंक्य साकोरे,दत्तात्रय देशमुख,रघूनाथ मोरमारे,रामचंद्र विरणक उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनासाठी वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही.वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे,मयूर सेठ यांच्या माध्यमातून हर्षद सुराणा,सांभव भाटिया,दिपेन जैन तसेच संतोषी मित्र मंडळ,पुणे यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन दिली.
चरित्रात्मक पुस्तके वाचल्याने व्यक्ती चारित्र्यवान बनतो.संस्कार ही काळाची गरज असून पुस्तकांचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्यसाधारण आहे,असे मत माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी व्यक्त केले.अभंग प्रतिष्ठानने भविष्य काळात स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावीत अशी अपेक्षा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केली.पुस्तकांमुळे माणूस परिपूर्ण बनतो.चारित्र्य व समाजकार्य हीच माणसाची खरी संपत्ती असून त्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे असे विचार प्रा.विकास कंद यांनी व्यक्त केले.श्री.गणेशजी काकडे यांनी यावेळी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके घेण्यासाठी अभंग प्रतिष्ठाणकडे निधी सुपुर्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अप्रतिम मनोगत व्यक्त केल्याबद्दल कु.ओवी थरकुडे या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उमेश माळी यांनी तर सुत्रसंचालन तानाजी शिंदे यांनी केले.संयोजन शांता विरणक,अर्चना गाढवे,मोहन भोईरकर यांनी केले. आभार सरपंच बळीराम भोईरकर यांनी मानले.

error: Content is protected !!