लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साकडे
पुणे :
पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत कराव्यात यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना साकडे घालण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांनी ही भेट घेतली.
सिंहगड एक्सप्रेसला जाताना व येताना तळेगाव स्टेशन येथे थांबा द्यावा.तसेच पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
या बाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दानवे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!