जयंत पाटील, रुपाली चाकणकर शनिवारी तळेगावात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ यात्रा
तळेगाव दाभाडे:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शनिवारी (दि.२६ फेब्रुवारी) रोजी मावळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
मावळचे आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी ही माहिती दिली. तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रबिंदू असून या केंद्रबिंदूशी संवाद साधण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मावळात येत आहेत. तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भावना, अनुभव, मते व सूचना पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचवाव्यात,असे आवाहन आमदार शेळके व तालुकाध्यक्ष भेगडे यांनी केले आहे.
या परिसंवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार आहेत,याकडे सर्वाचे लक्ष आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी पक्षाची भूमिका या वेळी मांडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!