टाकवे बुद्रूक:
आंदर मावळातील आंद्रा कॅम्प फार्म येथे इंडुरन्स ऍथलिट क्लब आयोजित ट्राईथोलोन स्पर्धा पार पडली. इंडुरन्स ऍथलिट क्लब आयोजित स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील 240 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते सुपर स्प्रिंट, स्प्रिंट ओलिंपिक असे तीन प्रकारामध्ये स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .ऑलम्पिक डिस्टन या प्रकारात दीड किलोमीटर पोहणे, त्यानंतर ४० किलोमीटर सायकलिंग व दहा किलो मीटर धावणे.
या स्पर्धेसाठी सर्वांत कमी वय असणारा नऊ वर्षाचा मुलगा होता, तर सर्वांत जास्त वय 60 असणारे स्पर्धक होते, या स्पर्धेसाठी पुणे – मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सातारा आशा विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.तसेच बॉम्बे शॉपर्स मिलेटरी व पोलिस मित्रांचा लक्षणीक सहभाग होता.
एन्ड्युरन्स ऍथलेट क्लब व सामाजिक संस्थेमार्फत तरुण व होतकरू युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे, आताच्या काळातील नवीन पिढीला व्यायाम करण्याची आस निर्माण व्हावी , तसेच यामध्ये तीन खेळ प्रकार असल्यामुळे शारीरिक क्षमतेचा कस लागतो, शारीरिक व्यायामामुळे आरोग्य सुदृढ राहते. परिणामी व्यायामामुळे शारीरिक व्याधी पासून व्यक्ती दूर राहते.
मागील दोन वर्षांपासून कोविड निर्बंध असल्यामुळे स्पर्धांवरती निर्बंध आले होते, covid-19 वरील नियम शिथिल केल्यानंतर प्रथमतः पुणे जिल्ह्यामधील सर्वात मोठी स्पर्धा एन्ड्युरन्स ऍथलेट क्लब व सामाजिक संस्थेमार्फत आंदर मावळमध्ये आंद्रा फार्म हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले,” येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धाचे नियोजन मावळ मध्ये याठिकाणी मोठया प्रमाणावरती केले जाणार आहे, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व मावळमधील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी घेऊन विविध प्रकारच्या मिळणाऱ्या सुविधाचा युवक-युवतींन सह वयोवृद्धांनी हि याचा फायदा घेणे गरजेचे आहे .
या स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील युवक-युवतींन वरती जास्त प्रमाणात भर असणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी आता पासुनच तयारीला लागावे, हि एक स्पर्धा नसून आरोग्यदायी वर्धनी आहे.
ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आंदर मावळ मधील युवक शेखर मालपोटे,नारायण मालपोटे यांनी त्यांचे स्वतःचे आंध्रा कॅम्प याठिकाणी स्पर्धकांना राहण्याची सुविधा त्यांच्या सायकल व फोर व्हिलर पार्किंग साठी मैदानातील मोकळी जागा, फार्म हाऊस उपलब्ध करून दिले, तसेच डेकाथलान (वाकड), चॅम्प एन्ड्युरन्स ,गार्मिन,व मातोश्री नागरी पंत संस्था,यांनी हि सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी यांचे विशेष सहकार्य लाभले.
एन्ड्युरन्स ऍथलेट क्लब मधून विशिकांत उपाध्याय, वैभव ठोंबरे, यतिष भट्ट, श्रीराम राय, आमिर नागारिया, परितोष मोहिते व आर्यन उपाध्याय या सर्वांचा नियोजनामध्ये मोठा पुढाकार होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

error: Content is protected !!