पंडित नेहरू विद्यालय, कामशेत येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
कामशेत:
येथील पंडीत नेहरू विद्यालयात विद्यालयात शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्राचार्य आजिनाथ ओगले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य उमेश सोनवणे, पर्यवेक्षिका धनश्री साबळे ज्येष्ठ अध्यापक भीमराव भोसले, जेष्ठ अध्यापिका सविता गडहिरे. ज्येष्ठ लिपिक भिकाजी केंगले उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचा पाळणा व ओव्या गायल्या. यावेळी अनेक विद्यार्थ्यींनींनी राजमाता जिजाऊंचा वेष परिधान केला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याची ख्याती सांगितली. महाराजांविषयीचे पोवाडे गायले. विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनींनी यात सहभाग घेतला. त्यात इच्छा निकाळजे, श्रेया थोरवे, समृद्धी शिंदे, समीक्षा जगताप, प्रणव तोंडे, रितेश गौतम, रोहित वाघिरे, दर्शना लालगुडे, सोनिया ओव्हाळ, रिया कुटे, राधिका येवले, ओमकार वायाळ यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मावळमधील पिंपळोली गावचे शाळेचे माजी विद्यार्थी शिवव्याख्याते चेतन पिंपळे यांचे व्याख्यान झाले‌. “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर अतिशय ओघवत्या भाषेत इतिहासातले अनेक दाखले देऊन आजच्या तरुण पिढीला मोलाचा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्यअजिनाथ ओगले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व राजमाता जिजाऊंची शिकवण आचरणात आणावी असा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद वाजे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना दरंदले यांनी केले.आभार प्रदर्शन संदीप बोंबले यांनी केले.

error: Content is protected !!