पंडित नेहरू विद्यालयात लायन्स क्लब कामशेत तर्फे सॅनेटरी नॅपकिन चे वाटप
कामशेत :
लायन्स क्लब कामशेत आयोजित
लायन्स क्लब कामशेतच्या उपाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे तसेच माजी रीजन चेअरपर्सन महेश शेट्टी यांच्या तर्फे पंडित नेहरू विद्यालय कामशेत विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील शिकणाऱ्या मुलींचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी ३०५ मुलींना सॅनिटरी नॅपकिन व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजीनाथ ओगले ,लायन्स क्लब कामशेतच्या अध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे , उपाध्यक्षा सायली बोत्रे , माजी रिजन चेअरपर्सन महेश शेट्टी, माजी झोन चेअर पर्सन जितेंद्र बोत्रे, यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाच्या पर्यवेक्षिका धनश्री साबळे, सेक्रेटरी नंदा शेट्टी, खजिनदार आशा अगरवाल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी पाटील व सूत्रसंचालन संदीप बोंबले यांनी केले. आभार प्रदर्शन पूनम कचरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कविता गायकवाड, पूजा धनवटे, सृष्टी गायखे ,काजल पावरा यांनी केले.

error: Content is protected !!