जिल्हा परिषद शिक्षकांचे NET ( राष्ट्रीय पात्रता ) परीक्षेत यश
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांब्रे ना. मा.येथील माधव मारुती गुरव सर यांनी सहाय्यक प्राध्यापक NET ( राष्ट्रीय पात्रता परीक्षेत) यश मिळवले.
मावळ तालुक्यातील एका दुर्गम भागातील विद्यार्थीप्रिय क्रीडाशिक्षक व तंत्रस्नेही शिक्षक यांचे हे यश जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. माधव गुरव सरांनी मावळ तालुक्यातील दुर्गम भागात 20 वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच शैक्षणिक प्रगती करून त्यांनी हे यश मिळवले आहे.
त्यांची सध्याची शाळा मावळच्या पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागात असून त्यांच्या शाळेत 161 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड.असून नुकतेच ते पीएचडी पात्रता परीक्षेतही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे शिक्षण पुणे विद्यापीठात बहिःस्थ पद्धतीने झाले असून त्यांना डॉ. नानासाहेब पवार व डॉ. नवनाथ वाजगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

error: Content is protected !!