वडगाव मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ता अभ्यास शिबीर
वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज ओरिटेल हॉटेल, वडगांव येथे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
“कार्यकर्ता अभ्यास शिबीर” कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. तदनंतर सर्व मान्यवरांचा वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या शिबिरात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबरजी दुर्गाडे सर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.सुनिलजी गव्हाणे, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविकांतजी वर्पे, आमदार श्री.सुनिल आण्णा शेळके या प्रमुख पाहुण्यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
झालेल्या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धैर्य धोरण, विकासाचा अजेंडा, सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न, पक्ष संघटना व निवडणूक पध्दती, बदलणारी राजकीय आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना पक्ष संघटना बळकट करून कार्यकर्त्यांशी सवांद साधत त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन नागरिकांच्या प्रश्नात लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांशी सवांद आणि पक्ष संघटना बळकट करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून या सर्व गोष्टींविषयी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.बबनराव भेगडे, सभापती कृ पशु समिती श्री. बाबुराव आप्पा वायकर, मा. ता. ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष श्री.सुभाषराव जाधव, मा सभापती श्री.गणेशआप्पा ढोरे, जि. नि. समिती सदस्य श्री.विठ्ठलराव शिंदे, मा ता.कार्याध्यक्ष श्री.दिपकआण्णा हुलावळे, मा. उपसरपंच श्री. तुकाराम उर्फ बुवा ढोरे, जेष्ठ नेते श्री.अशोकराव बाफना, नगराध्यक्ष श्री.मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष सौ. शारदा ढोरे, वडगाव शहर रा.काँ. अध्यक्ष श्री.राजेंद्र कुडे, चेअरमन वि.का.सोसायटी श्री.चंदुकाका ढोरे, सरचिटणीस रा.काँ. श्री गंगाराम ढोरे, नगरसेवक श्री.राहुल ढोरे, नगरसेवक श्री.सुनिल ढोरे, नगरसेवक श्री. चंद्रजीत वाघमारे, नगरसेविका सौ.माया चव्हाण, मा चेअरमन कृ.उ. बाजार समिती श्री. पंढरीनाथ ढोरे, रा. काँ. महिला आघाडी वडगाव शहराध्यक्षा सौ. मीनाक्षी ढोरे, कार्याध्यक्ष पु.जि. रा. काँ ओबीसी सेल श्री.अतुल राऊत, रा. काँ. युवक शहराध्यक्ष श्री.भाऊसाहेब ढोरे, मा. ता. ओबीसी सेल अध्यक्ष श्री.मंगेश खैरे, मा. ता. अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष श्री.आफताब सय्यद, शहर कार्याध्यक्ष श्री. सुरेश जांभुळकर, रा. काँ. मा. अध्यक्ष श्री.विलास दंडेल, मा.ता. क्रिडा सेल अध्यक्ष श्री. विक्रमसिंह देशमुख, वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष श्री.मयूर गुरव, वडगाव शहर रा.काँ.विद्यार्थी सेल अध्यक्ष कु.पवन ढोरे, पदवीधर म.सं. वडगाव शहराध्यक्ष श्री.सौरभ सावले, सा.न्या. विभाग रा.काँ. वडगाव शहराध्यक्ष श्री. गणेश पाटोळे, रा.काँ. सोशल मीडिया शहराध्यक्ष कु.राहिल तांबोळी तसेच वडगाव शहरातील आजी-माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता अभ्यास शिबिर या कार्यक्रमादरम्यान वडगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.खंडेराव जाधव, मा.ता. युवक काँग्रेस आय प्रसिद्धीप्रमुख श्री. सिद्धेश ढोरे तसेच वडगाव शहर युवक काँग्रेस आय सोशलमीडिया अध्यक्ष श्री. यशवंत शिंदे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे सर्व कार्यकर्त्यांनी अमलांत आणून तसेच शहरातील सर्वसामान्यांचे अगदी छोट्यातील छोटी कामे मार्गी लावूनच कार्यकर्ते घडले पाहिजेत व आपण सर्वांनी देखील शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बळ द्यायला हवे अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!