पिंपरी:
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींचा शब्द पब्लिसिटीच्या वतीने प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर,संतोष सौंदणकर,शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कामशेत येथील महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांच्यासह अन्य जणांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सामंत म्हणाले,” माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे सहकार्य आहे. पत्रकारांवर हल्ले,त्यांच्या अंगावर धावून जाणे हे वाढलेले प्रकार चुकीचे आहे. ही आपली संस्कृती नाही.
डाॅ. करमळकर म्हणाले,”कोरोना काळात काम करणे मोठे आवाहन होते,ही आवाहने स्वीकारून समाजातील वेगवेगळ्या घटकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. संतोष पाचपुते यांनी सुत्रसंचालन केले. धनश्री घोडे यांनी आभार मानले.
डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” या यथोचित सन्मानाची ही शाबासकीची थाप मिळाली. यातून या पुढे काम करण्यासाठी बळ मिळणार आहे. या पुढे भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठीची ही उर्जा आहे.

error: Content is protected !!