वडगाव मावळ:
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निगडे ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
निगडे गावच्या आदर्श सरपंच सविता बबूशा भांगरे, उपसरंपच रामदास चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे, पुजा भागवत, मिरा भांगरे पोलिस पाटिल संतोष भागवत ,शा.स.अध्यक्ष संतोष भांगरे ,बबूशा भांगरे,प्रविण साळवे , शांताराम शेजवळ, मधुकर पाटारे, निलेश भागवत, बाळू पुंडले ,ग्रामपंचायत कर्मचारी संजय भागवत, सतीश थरकुडे,सहादु ठाकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,” रयतेच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नका अशी ज्यांच्या राज्यात ताकदी होती. ते छत्रपती शिवाजीमहाराज प्रजावत्सल लोकाभिमुख राजे होते.अठरा पगड रयतेला सोबत घेऊन जाती धर्माच्या भिंती तोडून महाराजांनी रयतेचे राज्य आणले.

error: Content is protected !!