शिवनेरी:
आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात व उत्साहात साजरा केला जात आहे.
आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता. किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण असून शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
पोलिसा कडून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर दुमदुमतोय. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवभक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. आज शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जात आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी केली जात आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही आज शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

error: Content is protected !!