आपणावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून खडकवासला, कर्जत व चिंचवड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
तरी, वरील नमूद केलेल्या विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षाचे उमेदवार यांच्याशी समन्वय साधून सर्व तालुक्यांचा दौरा करावा. विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन बुध बांधणी, प्रदेश स्तरावरील कार्यक्रमांचे नियोजन, विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना बळकट व मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे.
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती इ. निवडणुकांच्या दृष्टीनेही पूर्वतयारी करावी. पुढील विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा हे उद्दीष्ट समोर ठेवून आपण ही जबाबदारी पार पाडावी.
त्यासाठी वारंवार दौरा करावा, त्या मतदारसंघातील गट तट संपविणे, पक्षात आवश्यकतेनुसार राजकीय प्रभावी व्यक्तिंना आणणे याबाबत काही सूचना, निरीक्षण आपण तत्परतेने कळवावे. आपला सहभाग महत्वाचा असून त्यानुसार वरिष्ट पातळीवर दखल घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे पत्रात नमूद केले आहे.

आमदार सुनिल शेळके यांच्या कडे खडकवासला, कर्जत चिंचवड विधानसभा निवडणूकीची जबाबदारी
वडगाव मावळ:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन १०० राबवायला सुरूवात केली आहे. यासाठी पक्षातील नव्या पिढीतील आमदारांवर शेजारील मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्या पाच मतदारसंघांची जबाबदारी दिल्या नंतर मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यावरही खडकवासला, कर्जत व चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जबाबदारीचे पत्र आमदार शेळके यांना दिले आहे.
या पत्रात प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले;”
सन २०१९ च्या महत्वपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विरोधकांवर मात करून मोठ्या मताधिक्याने निवडून आला आहात. आपण आपल्या मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत आहात व विकास कामांवर देखील लक्ष ठेवून कार्यरत आहात.

error: Content is protected !!