वडगाव मावळ:
आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आंबळे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या हद्दीतील मतदार सभासदांनी आपापल्या गटातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .
स्थानिक पातळीवरील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एकमत होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली.
रामदास यशवंत शेटे (इतर मागास प्रवर्ग),मोहन शंकर घोलप (सर्वसाधारण मतदार), विलास सिताराम भालेराव (अनुसूचित जाती जमाती), बंडू दामू घोजगे (सर्वसाधारण मतदार),हनुमंत ज्ञानू हांडे (सर्वसाधारण कर्जदार),सिंधूबाई पंढरीनाथ शेटे (महिला प्रतिनिधी),बाबाजी जयराम वायकर (सर्वसाधारण कर्जदार),मंगेश धर्माजी चतुर (सर्वसाधारण कर्जदार),सिताराम ज्ञानेश्वर आंभोरे (सर्वसाधारण कर्जदार),बंडू तुकाराम कदम (सर्वसाधारण मतदार),पांडुरंग प्रल्हाद शेटे (सर्वसाधारण मतदार),सुलाबाई बापू कदम (महिला प्रतिनिधी) या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. आर.के.निखारे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. आंबळे सोसायटीच्या बिनविरोध करण्यासाठी विशेष सहकार्य व मध्यस्थी सरपंच मोहन घोलप ,ज्येष्ठ नेते गोविंदराव आंभोरे व माजी उपसभापती शांतराम कदम ,दत्तात्रय वायकर या सर्वांनी प्रयत्न करून आंबळे विकास सोसायटी बिनविरोध केली. या वेळी उपस्थित गावातील ग्रामस्थ व ज्येष्ठ मंडळी विजय उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!