कामशेत:
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत येथील डाॅ.विकेश मुथा यांच्या महावीर हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरातील शस्त्रक्रियेला आज शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी नोंदणी केलेल्या रुग्णांपैकी चार रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,
डाॅ.विकेश मुथा, डाॅ. शैलेश शहा,डाॅ.निकेश जैस्वाल,डाॅ. श्रीकांत रावण, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष गणेश भोकरे, ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला.
पहिल्या दिवशी चार जणांचे सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया झाली असून नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे.
खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मूळव्याध,हर्निया,अॅपेन्डिस,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया, अंगावरील गाठ,गर्भाशयाची पिशवीची व्याधी,पोटाचा घेर,वाढलेले वजन अशा अनेक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करता येणार आहे.
सर्वसामान्य रुग्णांसाठी आपले वाटणारे महावीर हाॅस्पिटल कायमचे रुग्णसेवेवर कटिबद्ध आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा विविध उपक्रमांतून रूग्णसेवा करीत आहे.
मूळव्याध,हर्निया,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया,अंगावरील गाठ,व्रण,गर्भाशयाची पिशवी,पोटाचा घेर या शस्त्रक्रिया सवलतीत करता येणार आहे.
प्रथम नोंदणी करणा-या ५१ रूग्णांना ही सवलत देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ९८२२४०३४२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुथा यांनी केली. या बाबतीत अधिक आपल्याला महावीर हाॅस्पिटल मध्ये घेता येणार आहे. आतापर्यंत शेकडो रूग्णांनी या व्याधीवर उपचार घेऊन आनंदात जगत आहेत.रोजच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या रूग्णांच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी महावीरने ही योजना आणली आहे.
वैशाली ढिले म्हणाल्या,” मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल असे आवाहन महावीर हाॅस्पिटलच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनानुसार माझ्या पोटातील गाठीची शस्त्रक्रिया करून घेतली. महावीर हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनास मनापासून धन्यवाद देते.

error: Content is protected !!