टाकवे बुद्रुक:
येथील बाळराजे युवा मित्र मंडळाच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती महोत्सव होणार असून श लोहगड ते टाकवे बुद्रुक अशी शिवज्योत आणली जाणार आहे.
सकाळी १० वा. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळयांचे तसेच राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले जाणार असून सायंकाळी साडेपाच वाजता राजे शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
करमणुकीचा कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) असून भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ता.२७ ला आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बैलगाडा स्पर्धेचे उद्घाटन होणार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक माऊली दाभाडे,जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बैलगाडा शर्यतीसाठी रोख रक्कमेसह विविध वस्तूचे बक्षीसे असणार आहे.

error: Content is protected !!