काळे व मिंडे- मांडेकर जुगलबंदी घाटातील हिंदकेसरी
तळेगाव दाभाडे :
सात वर्षानंतर पहिल्यांदाच मावळात पार पडलेल्या दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीमध्ये जवळपास ४०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील पहिल्या दिवशी कै. पांडुरंग किसन काळे श्रीगोंदा ( ११.४० सेकंद) व दुसऱ्या दिवशी काळुराम भिकाजी मिंडे – मांडेकर जुगलबंदी यांचा गाडा घाटाचा मानकरी ठरला आहे.
तसेच फायनल सम्राट चे रामनाथ वारिंगे (११.३४ देकंद), कै. सहादू काळोखे (११.६४ सेकंद), भेगडे राक्षे जुगलबंदी (११.७२ सेकंद), संतोष ज्ञानेश्वर मांडेकर, काळूराम भिमाजी मिंडे-मांडेकर, आशिषशेठ येळवंडे हे मानकरी ठरले आहे.तर दुचाकीचे मानकरी कदम-घोलप पडवळ-तोडकर जुगलबंदी, अशोकदादा राक्षे, चैतन्यदादा बोराटे, संकेत शिंदे, मुकुंदशेठ बोराटे, कै. सहादुमामा काळोखे, देवराम काटे, निवृत्ती शेटे, विकास वाडेकर, रामनाथ वारिंगे, पांडुरंगशेठ काळे, बोधलेबुवा बैलगाडा संघटना, पांडुरंग किसन काळे-गणपत खेडकर, खंडूशेठ नाईकरे, जय गणेश बैलगाडा संघटना, विकासशेठ नायकवडी, माजी महापौर राहुल जाधव, मयूर शामराव आरबूज, काळे-राक्षे जुगलबंदी, संतोष ज्ञानेश्वर मांडेकर-जाधव, आशिष येळवंडे, काळभैरवनाथ मित्र मंडळ, आदित्यराज हनुमंत घुंडरे, रवींद्र निवृत्ती शेटे, अशोक विठ्ठल पचपिंड • अजिंक्य सुधीर खांडेभराड हे ठरले आहेत.
पहिला दिवशी फळीफोडचे मानकरी नवनाथ पडवळ, देवीदास कदम, गुरुदेव घोलप, संभाजी तोडकर ठरले आहेत तर दुसरा दिवशी फळीफोडचे मानकरी संतोषशेठ मांडेकर, पंडीत जाधव हे ठरले आहेत.

error: Content is protected !!