डबेवाला भवनचा प्रश्न मार्गी लागल्या नंतर डबेवाल्यांची एकच मागणी.
आजी/ माजी डबेवाल्यांना सरकार कडून अल्प दरात घरे उपलब्द झाली पाहीजे
मुंबई:
गेली १३० वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थीक क्षमता नसल्या मुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकला नाही. त्या मुळे बहुतांश डबेवाल्यांना मुंबईत आपले स्व:ताचे घर नाही बरेचसे डबेवाले हे झोपडपट्टीत, भाड्याच्या खोलीत,गावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीत रहात आहेत. या डबेवाल्यांना सरकारने अल्प दरात घरे उपलब्द करून दिली पाहीजेत , अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.
मुंबईतील गिरण्या बंद झालेल्या आहेत. त्या मुळे मराठी गिरणी कामगार नामशेष झाला मुंबईतील गोदी, भाजी मार्केट, घाऊक बाजार मुंबई बाहेर गेले आहेत. त्या मुळे या क्षेत्रातील मराठी कामगार मुंबईतुन परागंदा झाले आहे. मुंबईतील अनेक व्यवसायही परप्रांतीयांच्या हातात गेलेले आहेत. विकासक,ठेकेदार,कुशल अकुशल कामगार या क्षेत्रामध्येही बिगर मराठी माणसे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. आता मुंबईत २२% मराठी माणुस उरला आहे.
आपल्या मेहनितीच्या व चिकाटीच्या जोरावर डबेवाल्यांचा गैर सरकारी व्यवसाय अजुन ही मराठी माणसांच्या हातात आहे. डबेवाले ही सेवा गेली कित्येक वर्षे अविरतपणे देत आहे. हा डबेवाला कामगार मुंबईच्या बाहेर घालवायचा नसेल तर त्याला सरकारने मुंबई मध्ये अल्प दरात घर उपल्ब्द करून दिले पाहीजे. तरच तो मुंबई शहरात टिकून राहू शकतो.
डबेवाल्यांना मुंबई मध्ये हक्काचे घर मिळाले पाहीजे. या साठी २००४ साला पासून सरकार दरबारी डबेवाले सतत मागणी करत आहे. तात्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीत डबेवाल्यांना घरबांधणी साठी भुखंड देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्वासन वेळो वेळी डबेवाल्यांना दिले. विद्यमान उप मुख्यमंत्री आणी आमच्या पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहीजे या बाबत मंत्रालयात बैठकी घेतल्या आहेत.
डबेवाल्यांना आशा आहे की म.वि.आ. सरकारच्या कालावधीत डबेवाल्यांचा घरांचा प्रश्न नक्की सुटेल व डबेवाल्यांना मुंबईत हक्काचे घर मिळेल.
सरकारला आमची विनंती आहे की डबेवाला कामगार यांचे मासिक उत्पन्न तुटपुंजे आहे “अती अल्प उत्पन्न” गटा पेक्षाही त्याचे मासिक उत्पन्न कमी आहे. तेव्हा त्यांना परवडणार्या दरात म्हणजे पाच/ सहा लाखात मुंबईत घरे उपलब्द करून दिली पाहीजे,आणी ते पैसे भरण्यासाठी बॅन्केतून सुलभ हप्त्यावर गृहकर्ज उपलब्द करून दिले पाहीजे. जर असे झाले तर डबेवाल्यांचे मुंबईत आपले स्व:ताच्या हक्काचे घराचे स्वप्न साकार होईल.
या मुंबईत माथाडी कामगार यांना घरे मिळाली, गिरणी कामगार यांना ही घरे मिळाली मग डबेवाला कामगारांना ही मुंबईत घर मिळाली पाहीजेत अशी रास्त मागणी डबेवाले कामगारांची आहे.

error: Content is protected !!