सह्याद्री विद्यार्थी अकादमी महाराष्ट्र राज्य मावळ आयोजित क्रीडा साहित्य वाटप
पवनानगर:
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विध्यार्थी अकादमी महाराष्ट्र राज्य आयोजित मावळ तालुक्यातील पवन मावळ येथील अतिदुर्गम भागातील येलघोल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मैदानी खेळाचे ( क्रीडा ) साहित्य वाटप करण्यात आले.
सह्याद्री विध्यार्थी अकादमी च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर अतिदुर्गम भागातील शालेय विध्यार्थ्यांसाठी अनेकविध उपक्रम राबवण्यात येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न केले जातात.
त्याचाच एक भाग म्हणून मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास होणे देखील महत्वाचे असते ह्याच साठी सह्याद्री विध्यार्थी एकदमी च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलघोल पवन मावळ येथे क्रीडा साहित्य देण्यात आले त्यामध्ये ढोल, ताशा, लेझीम, घुंगरूकाठी, डंबेल्झ, फुटबॉल, बॅटबॉल,लगोरी, भाला, गोळा आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल
त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम सादरीकरण केले. प्रसंगी सह्याद्री विध्यार्थी अकादमी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये सदानंद पिलाने ( कार्यकारी अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सचिन शेडगे ( सह्याद्री प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष ) चेतन वाघमारे ( सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ अध्यक्ष ) किरण ढोरे ( सह्याद्री विध्यार्थी अकादमी संपर्क प्रमुख मावळ ) तसेच सह्याद्री विध्यार्थी अकादमी चे सर्व पदाधिकारी सोमनाथ चोपडे, विशाल सुरतवाला, अश्विन दाभाडे, किशोर वाघमारे, अमर गवारे, राहूल राजीवडे संदीप जाधव, भाऊ ढाकोळ, कुंदन भोसले, निलेश ठाकर, लक्ष्मण शेलार सर , देविदास आडकर सर तसेच येलघोल चे सरपंच जयंवंत घारे, उपसरपंच गोरक्षनाथ घारे, सदस्य स्वप्नील शेडगे,शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष एकनाथ घारे, उपाध्यक्ष प्रकाश कदम,महेंद्र सोनावणे शाळेचे मुख्याध्यापक धोंगडी मॅडम, कांबळे मॅडम, शिवले सर, भेगडे सर ,तांदळे सर येलघोल येथील संपूर्ण ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवले सर यांनी केले तर प्रस्तावना सह्याद्री प्रतिष्ठान मावळ चे अध्यक्ष सचिन शेडगे यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार तांदळे सर व सह्याद्री प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष सदानंद पिलाने यांनी केले.

error: Content is protected !!