
रस्त्यावर गतीरोधक करण्यासाठी भाजपा-युवा मोर्चाची नगरपंचायतकडे मागणी
वडगाव मावळ:
येथील माळीनगर भागांतर्गत नव्याने झालेले रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे सर्व प्रकारचे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवत असतात.तसेच या रस्त्यावरून पादचाऱ्यांचीही ये-जा चालू असते आणि रस्त्यालगत अनेक स्थानिक लहान मुले खेळत असतात.
सुसाट वेगाने वाहने चालवत असताना मागील काही दिवसांत या रस्त्यावर अपघाताचे प्रकार घडले आहेत.परंतु सुसाट वेगवान वाहनांमुळे येथे भविष्यातही जीवघेणे अपघात घडू शकतात.हे संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतीरोधक असणे गरजेचे असून लवकरात लवकर गतीरोधकाचे काम पुर्ण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा-युवा मोर्चाने स्थानिक नागरीकांच्या स्वाक्षरीसह नगरपंचायकडे केली आहे.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,प्रमोद म्हाळसकर,विराज हिंगे,समीर गुरव,कल्पेश भोंडवे,गणेश भिलारे शेखर वहिले ,गोकुळ काकडे ,कुलदीप ढोरे,सूर्यकांत भिलारे,आदी उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



