डबेवाल्यांचे स्थित्यंतर
मावळमित्र न्यूज विशेष:
हा काळ होता १८९० चा या काळात संपुर्ण भारतभर इंग्रजसत्ता स्थिरावली होती. भारताचा इंग्लंड किंवा युरोपशी जो व्यापर चालत होता तो प्रामुख्याने मुंबईच्या बंदरांतुन चालत होता. त्या मुळे मुंबई मध्ये विशेषता दक्षिण मुंबई मधिल फोर्ट परिसरात व्यापार करणार्या कंपन्यांची कार्यलये सुरू झाली. या कार्यालयात काम करणारे तात्कालिन सुशिक्षित समाज म्हणजे पारशी समाज त्यांना इंग्रजी चांगले यायचे ते तेथे काम करू लागले.
तर ईकडे मावळात (पुणे जिल्हाचा पश्चिम भाग) प्रामुख्याने मावळ मराठा असलेला समाज एका भावाने शेती करावी तर दुसर्या भावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य साठी लढाई लढाव्यात त्याचा काही मोबदला मिळाला तर तो कुटुंबाच्या चरितार्थसाठी कामी येत असे… अशा प्रकारे मावळातील बहुतेक कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. पुढे काळाच्या ओघात राजे- महाराजे गेले मग पेशवे आले त्यांचे सोबत लढाईत ही मावळ मराठा कायम राहीला येथील अशी कोणती पंचक्रोशी नाही की तेथील गावातील योध्दा पानिपतावर शहिद झाला नाही. पुढे पेशवाई ही गेली सैन्यातील नोकरी कायमची गेली मग लढाईला जाणारा भाऊ पुन्हा शेती कडे वळला..


पुढे कुटुंबकबीला वाढत जावू लागला तसं तसा शेतीवरील बोजा वाढू लागला शेतीचे उत्पन्न कमी पडू लागले. नविन उत्पनाचे मार्ग शोधायला सुरवात झाली आणी त्यातुनच त्याने मुंबईची वाट धरली.
मुंबईत आल्यावर तो हमालकी, हेलपाटी, अशी अंग मेहनतीचे कामे करत असे. काम करताना त्यांची एका पारशी साहेबाशी ओळख झाली तो पारशी साहेब रहायला गावदेवी येथील पारशीवाड्यात होता व कामाला फोर्ट येथील कार्यालयात होता तो रोज दुपारी घरी जेवायला यायचा व जेवून पुन्हा कामावर जायचा तेव्हा त्यांचा दिड तास या मध्ये जायचा हे त्यांनी पाहीले आणी त्या साहेबाला सांगितले साहेब तुम्ही घरी येवून जेवून पुन्हा कामावर जाता तुमचा दिड तास वाया जातो दर तुमचा डबा मी दुपारी कार्यालयात आणुन दिला तर तुमचे जेवण अर्धा तासात होईल व तुमचा एक तास वाचेल तुम्ही एक तास जास्त काम करू शकता… हि कल्पना पारशी साहेबाला पटली आणी त्याने डबा सुरू केला तो काळ होता १८९० चा.
हळू हळू मुंबईचा विकास होत गेला तसं तसा डबेवाल्यांचा व्यापर ही वाढत गेला. डबेवाल्यांची संख्या ही लक्षणीय रित्या वाढत होती दक्षिण मुंबईत जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या कॅान्वेंट शाळा होत्या तेथेल मुलांना ही डबे जावू लागले अनेक दुकानाचे मालक विषेशता गुजराती / मारवाडी यांनी ही घरून डबे चालू केले.. डबेवाल्यांची संख्या शेकडो वरून हजारात गेली व डबे हजारा वरून लाखात गेले हे कधी कळलेच नाही.
दरम्यानच्या काळात डबेवाला आपल्या कामा मुळे प्रसिध्द झाला त्यांचा ठिक ठिकाणी गौरव होऊ लागला होता. मान सन्मान मिळत होता. कामा मुळे पदरी दोन पैसे पडत होते.
मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”


डबेवाला काम जरी मुंबईत करत होता तरी आपल्या कामा मधुन मिळालेल्या पैशातुन तो आपल्या गावी आपल्या आई/वडीलांना पैसे पाठवत होता शेती करणार्या भावाला यथाशक्ती मदत करत होता.
सर्व काही सुरळीत चालू असताना ऐखादी विज कोसळावी तशी करोना महामारी कोसळली आणी सर्व होत्याचे नव्हते झाले. सर्व प्रथम शाळा बंद झाल्या त्या मुळे शाळेचे डबे बंद झाले मग लॅाकडाऊन झाले कार्यालये, दुकाने बंद झाली त्या मुळे सर्वच डबे बंद झाले. वर्क फ्रॅार्म होम याचा मोठा प्रभाव व्यवसायावर पडला जवळ जवळ डबे पोहचवणे व्यवसाय बंद झाला…
मग डबेवाला ईतर रोजगारा कडे वळला कोणी रिक्षा चालवू लागला तर कोणी नाक्यावर हमाली करू लागला. कोणी सेक्युरटी गार्ड झाला तर कोणी माळीकाम करू लागला तर कोणी गावाकडे शेती करू लागला तर कोणी चाकण, तळेगाव एम आय डी सी मध्ये कामाला जावू लागला….
अशा प्रकारे १८९० साली मुंबईत सुरू झालेल्या या व्यवसायावर २०२० साली आलेल्या करोना या महामारीचा मोठा परिणाम झाला.
तरी अशा स्थितीत ही काही मोजके डबेवाले अती मेहनत घेऊन थोड्या प्रमाणात का होईना पण सेवा देण्याच्या प्रयत्न करत आहेत त्यांचे मना पासुन कौतुक आहे. करोना महामारी जावून जिवन परत पुर्व पदावर आले तर आणी तरच डबे पोहचवण्याचा व्यवसाय उभारी घेवू शकतो.
त्या मुळे प्रत्येक डबेवाला आपल्या पांडूरंगाला साकडे घालतो आहे की “ बा पांडूरंग या जगातून करोना महामारी नष्ट होऊदे” व सर्व जिवन पुर्व पदावर येऊ दे….

error: Content is protected !!