बीड:
बीड विधानसभा मतदारसंघातील १०० कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन.मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या विकासकामाला गती मिळाली. वीस-पंचवीस वर्षांपासून मतदारसंघाच्या विकासची खद-खद जनतेच्या मनात होती. म्हणून यंदा जनतेला बदल हवा होता. बीडच्या जनतेने मला आशीर्वाद देऊन हा बदल केला त्यांच्या आशीर्वादाची परत फेड विकासाच्या दृष्टीने अतिशय सुरेख पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
बीड हे जिल्ह्याचे ठिकाण असून स्वच्छ व सुंदर शहर करण्याच्या दृष्टीने पुढील विकासकामे होणे गरजेचे आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजुर करून घेतली. तर अनेक विकास कामांना निधी खेचून आणला. या कामांमुळे बीड मतदार संघाच्या विकासात मोठी भर पडणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रूग्णालय, बीड येथील वाढीव २००खाटांच्या इमारतीचे बांधकाम बीड येथे तालुका क्रीडा संकुलच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-जिम हॉल व कार्यालय इमारत,बीड येथे नवीन व्हिव्हिआयपी विश्रामगृह बांधणे व अस्तित्वातील विश्रामगृहाचे नूतनीकरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड या संस्थेची प्रशासकीय इमारत व कार्यशाळा,साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला-रस्ता,जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला पुलाचे बांधकाम,जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड.पुलाचे बांधकाम , बेलुरा-नारायणगड पुलाचे काम, बीड तालुक्यातील उरसे द्रुतगती वडगाव-चाकण-शिक्रापुर-जामखेड-बीड-म्हाळसजवळा-लऊळ-पात्रुड रस्ता,पालवण-नागझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव रस्ता,बेलुरा-नारायणगड रस्ता
साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्ता सुधारणा, करचुंडी ते पाटोदा रस्ता सुअःआरणाक, बीड रा.म.मा. ते पालवण-नगझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव-पाचंग्री रस्ता प्रजिमामध्ये सुधारणा ,बीड पंचायत समिती, जि.प.बीड नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम या कामासाठी इतक्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!