कामशेत: पंडित नेहरू माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम, कामशेत मध्ये शिक्षण महर्षी कै.बाबुरावजी घोलपसाहेब व सहकारमहर्षी कै. मामासाहेब मोहोळ यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात स्मृतीसप्ताहाचा सांगता समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले, ग्रामपंचायत कामशेतच्या उपसरपंच शिल्पाताई दौंडे,ग्रामपंचायत सदस्य अंजलीताई मुथा, दत्ता रावते, पत्रकार रामदास वाडेकर चंद्रकांत लोळे,शिवानंद कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यालयात स्मृतीसप्ताहाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व ,निबंध, चित्रकला, रांगोळी, शुभेच्छा पत्र या स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यालयाला ५० शोभिवंत झाडांच्या कुंड्या भेट दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रामदास वाडेकर यांनी आपल्या मनोगतातून बाबूरावजी घोलपसाहेब व मामासाहेब मोहोळ यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात जोपासावेत असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी चांगले ज्ञान घेऊन उत्तुंग यश मिळवावे असेही त्यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी प्राचार्य अजिनाथ ओगले यांनी विद्यालयात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बाबुरावजी घोलपसाहेब व मामासाहेब मोहोळ यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही शैक्षणिक संस्था उभारून बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या विचारांचा “वसा आणि वारसा” प्रत्येक विद्यार्थ्यांने जपावा असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य उमेश सोनवणे, पर्यवेक्षिका धनश्री साबळे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपा पारवे व शरद वाजे यांनी केले‌. दत्तात्रय पोवार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!