मावळमित्र न्यूज:
खडकाळयातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार आणि सहकाराला बळकटी देत सरपंच पदा पासून सुरू झालेली राजकीय कारकीर्द अधिक समृद्ध होत असताना मावळ तालुक्यातील राजकीय पटलावरील ध्रुव तारा अकस्मित निखळला.परंतू त्यांनी सुरू केलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांच्या स्मृती चिरकाल तेवत ठेवतील असे त्यांचे कार्य राजकारणात नव्या पिढीने कार्य करणा-या तरूण पिढीला निश्चितच प्रेरणादायक आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व बांधकाम समितीचे सभापती दिवंगत नेते स्व.दिलीप भाऊ टाटिया.मावळच्या राजकीय मातीशी अतूट नाते जपलेले नेतृत्व. राजकारणाची अवघी दहा वर्षाच्या कारकीर्द समृद्धीने फुलून गेली होती.
देव घरातील देव-हयात मूर्तीचे पूजन करावे त्याच देवघरात स्व. दिलीपभाऊ टाटिया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा असा जनाधार असलेला वर्ग मावळच्या मातीत आहे. भले दिलीपभाऊ टाटिया यांचे कार्यकर्ते मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या खुर्चीवर आज बसले नसतील. परंतू त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून कित्येकांचे राजकीय करिअर घडत असल्याची अनेक उदाहरणे मिळतील.
स्व.दिलीपभाऊ टाटिया, खडकाळा ग्रामपंचायतीचे सरपंच.गावातील जिल्हा परिषदेची शाळा सुसज्ज असावी म्हणून त्यांनी टाकलेले पहिले पाऊल. ज्या मुळे बाजारपेठे लगत जिल्हा परिषदेची भव्य वास्तू आज सहज नजरेत भरते. या इमारतीची मूळ संकल्पना दिलीपभाऊ यांची. तिथ पासून सुरू झालेले भाऊचे काम दिवसा गणिक वाढत गेले. आणि ती अधिक बहरले. युवक काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्ता पासून भाऊंचा सुरू झालेला प्रवास .
जिल्हा परिषदेच्या स्थायी व बांधकाम विभागाच्या सभापती पदापर्यंत पोहचला. आजही पुणे जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम करणा-या जिल्हा परिषद सदस्याला भाऊंच्या नावाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार देऊन गौरविले जाते. लोकनेते शरदचंद्र पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा स्नेह होता. भाऊंच्या निधनानंतर लोकनेते शरद पवार यांनी टाटिया कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते.
तर भाऊंच्या हयातीतच महाराष्ट्राचे युवा नेते म्हणून झपाटून काम करणारे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील नागाथली येथे ‘ढोल लेझीम पथकास ‘नोंदणी वाटप कार्यक्रम भाऊंनी घेतला होता. अजितदादा त्या सोहळ्यास उपस्थित राहिले नसल्याचे शल्य आजही टाटिया समर्थकांना आहे.
स्व.दिलीपभाऊच्या पुढाकारातून प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.ज्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक कवाडे खुली झाली. मुलींना शिक्षण मिळाले.
भाऊंचे हे शैक्षणिक कार्य असेच बहरत राहील यात तिळमात्र शंका नाही. नियतीच्या मनात वेगळचं असल्याने भाऊचे सोडून जाणे फक्त टाटिया कुटुंबियांना परके करून जाणे झाले नाही,तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणा-या हजारो कुटूंबाला पोरके करून गेले. आज त्यांचा स्मृतीदिन त्यांच्या आठवणी डोळया समोरून सहज तरळून गेल्या तरी संयमी व शांत पणे काम करीत राजकारणात यश मिळते याची प्रेरणा आजच्या पिढीला मिळून जाते. स्व.दिलीपभाऊ दिवंगत नेते खेड लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले प्रा.रामकृष्ण मोरे सर यांचे शिष्य होते.राजकारणातील या गुरू शिष्यांच्या जोडीचे समाजकारण आजच्या पिढीला प्रेरक आहे.

error: Content is protected !!