वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायत वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत
शून्य कचरा निर्मिती या संकल्पना स्वच्छपूर्ण हळदीकुंकू या कार्यक्रमात शहरामध्ये पाच प्रभागातील महिला भगिनींना वाण म्हणून कचरा वर्गीकरण व्यवस्थापनासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा शारदाकाकू ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मधील ढोरे वाडा, प्रभाग क्रमांक पाच मोरया चौक, प्रभाग क्रमांक सहा पंचमुखी मारुती मंदिर, प्रभाग क्रमांक सात मिलिंद नगर आणि प्रभाग क्रमांक आठ येथील पाटील वाडा याठिकाणी स्थानिक नगरसेवक राहुल ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, पुजा वहिले, चंद्रजीत वाघमारे यांनी शून्य कचरा निर्मिती या संकल्पनेतून “स्वच्छपूर्ण हळदीकुंकू” या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
आपले शहर स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले असून शहरातील नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करत ओला व सुका कचरा वेगळा करावा तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या अनुषंगाने आपले शहर स्वच्छ व सुंदर व्हावे याकरिता नगरपंचायत माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शून्य कचरा निर्मिती या संकल्पना स्वच्छपूर्ण हळदीकुंकू या कार्यक्रमात शहरामध्ये पाच प्रभागातील महिला भगिनींना वाण म्हणून कचरा वर्गीकरण व्यवस्थापनासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!