पिंपरी:
पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय ५२) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.
चिंचवडे सकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. लोकमान्य रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवड यांच्या अचानाक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सुरवातीला प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला.
पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती.

error: Content is protected !!