निगडे :
निगडे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबूशा भांगरे यांच्या पुढाकारातून महिला बचत गट महासंघाच्या वतीने सर्वजनिक हळदीकुंकू सभारंभ उत्साहात संपन्न झाले.
हळदी कुंकू समारंभात सर्व महिलांना वाण म्हणून कुंड्या वाटप करण्यात आले.प्रत्येकाने किमान दोन तरी झाडे लावली पाहिजे असे आव्हान करण्यात आले. सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले वाढते .प्रदूषण पाहता झाडं लावणे ही काळाची गरज बनली आहे यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे म्हणून म्हणून कुंड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी निगडे गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सदस्य पूजा भागवत ,सपना भागवत ,वर्षा थरकुडे, वैभवी शेलार , अनुराधा शेलार ,दिपाली भांगरे पूजा भांगरे ,कविता भांगरे ,शितल येवले,राजश्री खेंगले जयश्री भोईर ,प्रियंका भांगरे , निशा भांगरे ,रोशनी साळवे, शलाका साळवे, शितल भांगरे ,आशा वर्कर योगिता शेजवळ यांच्यासह अन्य महिलांनी झाडे लावण्याचा संकल्प केला.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,” निसर्गाचा समतोल पण वाढत चालला आहे. पर्यावरण संवर्धन गरज आहे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. शेतकरी बांधव आपल्या परी शेताच्या बांधावर झाडे लावीत आहे. आम्हा महिलांचा सहभाग असावा यासाठी वाण म्हणून कुंड्या दिल्या आहेत.

error: Content is protected !!