
खांडी केंद्राची शिक्षण परिषद बेंदेवाडी येथे संपन्न
वडेश्वर:
आंदर मावळ भागातील अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद बेंदेवाडी येथील प्राथमिक शाळेत संपन्न झाली.यावेळी केंद्रप्रमुख गंगाराम केदार,खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे,डाहूली शाळेचे मुख्याध्यापक यशवंत पवार,बोरवली शाळेचे मुख्याध्यापक विनायक पारखे,तज्ञ संचालक खंडू शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी १०० दिवस वाचन प्रकल्प प्रभावी राबवण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची पुस्तके तसेच वर्तमानपत्रे इ.चा सुयोग्य वापर करावा अशा सुचना केंद्रप्रमुख गंगाराम केदार यांनी दिल्या.शिक्षण परिषदेचे तज्ञ मार्गदर्शक रामेश्वर बागडे यांनी पूर्वचाचणी तसेच अध्ययन स्तर निश्चिती याविषयी मार्गदर्शन केले.दहा कलमी योजना व पुणे जिल्ह्यातील सद्यस्थिती याविषयी माहिती सुजाता भोसले व सुवर्णा वाडिले यांनी दिली.
READ TO ME अँप कसे डाऊनलोड करावे व त्याचा वापर कसा करावा यांविषयीचे मार्गदर्शन शिवाजी चौगुले व दत्तात्रय डावखर यांनी केले.१०० दिवस मराठी व इंग्रजी वाचन प्रकल्पाविषयी माहिती संगिता दाते व रुपाली गायकवाड यांनी दिली.वाचन व लेखनाचे महत्व सुशील कांबळे व दिपाली पारखे यांनी सांगितले.टँग मिटींग,उत्तर चाचणी व अध्ययन समृद्धी कार्यक्रम याविषयी झालेल्या चर्चेत उमेश माळी,राहूल,राठोड,राजू वाडेकर यांनी सहभाग नोंदवला.शिक्षण परिषदेचे आयोजन बेंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली निमकर व रामेश्वर बागडे यांनी केले.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप






