तळेगाव दाभाडे :
शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी केली.व स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
स्टेशन भागासह यशवंतनगर, वतननगर, राजगुरव कॉलनी, स्वराजनगरी, म्हाळस्कर वाडी, हरणेश्वर कॉलनी तसेच महावितरण कडे जाणारा रस्ता, भुयारी गटर, पाणी योजना या कामांची पाहणी केली. ही सर्व कामे होत असताना कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा,अशा ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. स्टेशन भागाला पाणी पुरवठा होत असलेल्या इंद्रायणी नदीवरील जॅकवेलच्या ठिकाणची पाहणी केली.
या भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. जॅकवेलच्या जवळच सांडपाणी सोडण्यात येत असल्याने दूषित पाणीपुरवठा या भागात होत आहे.त्यामुळे भविष्यातील विचार करता आंद्रा धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याचे प्रयोजन आहे.त्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा बनविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रस्ते,पाणी, सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा शहरातील नागरिकांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी संबंधित विकासकामे प्राधान्यक्रमाने करण्यावर भर असणार असल्याचे सुतोवाच आमदार शेळके यांनी दिल्या.
मुख्याधिकारी श्री.सतीश दिघे, नगरसेवक श्री.सुदर्शन खांडगे, श्री.निखील भगत, माजी नगराध्यक्ष श्री.कृष्णा कारके, माजी नगरसेवक श्री.सुरेश धोत्रे, श्री.संदीप शेळके, श्री.अशोक भेगडे, श्री.अनिकेत भेगडे, श्री.आशिष खांडगे आदि. पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!