नाणे मावळ मधील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे व ग्रामपंचायतीचे विद्युत कनेक्शन झाले सुरू, शेतकऱ्यांनी केले समाधान व्यक्त
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड व उप अभियंता अधिकाऱ्यांच्या चर्चेमधून मार्ग निघाल्याने नाणे मावळातील वीज कनेक्शन सुरू झाली आहे.
गेली काही दिवसापासून नाणे मावळातील शेतकऱ्यांच्या लाईटचे कनेक्शन कट करण्यात आले होते तसेच ग्रामपंचायतीच्या विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला होता.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कनेक्शन बंद करण्यात आलं होतं. सध्या उसाची तोड चालू असून नवीन ऊस लागवड चालू आहे, शेतातील अनेक कामे चालू झाली असून शेतीच्या कामाला वेग आला आहे ,अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा बंद केल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अचानक वाढीव बिल हातात आल्यानंतर शेतकऱ्यांना वीजबिल भरणे शक्य नसल्यामुळे यांचे कनेक्शन बंद करण्यात आले होते.
युवक अध्यक्ष कैलास गायकवाड आली विद्युत विभागाच्या ऑफिसला भेट दिली आणि अधिकाराची वर्गाची व मावळ तालुका उपअभियंता सूर्यवंशी साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा करून तात्काळ सरसकट सर्व शेतकऱ्यांची कनेक्शन चालू करण्यात आली. पुढील काळात वाढीव बिल कमी करावा, तसेच उरलेल्या बिलामध्ये हप्ते करावे अशी चर्चा देखील झाली. विद्युत पुरवठा चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये उभा राहणार असल्याचे कैलास गायकवाड यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!