टाकवे बुद्रुक : ‘अच्छे दिन’चा नारा देत मिशन अभिनव भारत काळात वाढणारी महागाई व भरमसाट होणारी इंधन दरवाढीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु, अवाढव्य वाढलेल्या गॅस आणि पेट्रोल, डिझेलच्या किमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील जनता वाढलेल्या गॅस दरवाढीने पुन्हा जुन्या रुढीप्रमाणे चुलीकडे वळली आहे. परंतु त्यासाठी सुरुवातीला त्या पेटविण्यासाठी प्लास्टिकच्या वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यातून सभोवतालचे वातावरण प्रदूषित होऊ लागले आहे. तसेच, महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.र्वी ग्रामीण भागात रेशनिंग दुकानावर रॉकेल (केरोसिन) मुबलक प्रमाणात मिळत होते. त्याचा वापर चुली, बंब पेटविण्यासाठी होत होता. परंतु, आता मागील काही वर्षापासून रेशनिंग दुकानावर व इतरत्रही रॉकेल शासनाने बंद केल्याने कोठेही ते मिळत नाही. चुली, बंब पेटविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वनातून, जंगलातून, रानातून वृक्षाची संख्या कमी असल्याने पुरेशा प्रमाणात जळण मिळत नाहीत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, जमिनीची धूप होऊ नये, म्हणून ग्रामीण भागात जंगलातून वृक्षतोड बंदीची अंमलबजावणी केली आहे.

ग्रामीण भागातील महिला घरी आणलेल्या बाजारातील प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या साठवून सकाळी सकाळी उठून त्यांचा वापर अंघोळीच्या पाण्याचा बंब व चुली पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे सकाळची ताजी हवा दूषित होऊन, वातावरण दूषित होत आहे. वातावरणात प्लास्टिकचे कधी विघटन होत नाही, उलट त्यामुळे हवेचे प्रदूषणच मोठ्या प्रमाणावर होते. प्लास्टिक वितळल्याने जाळ होत असला तरी त्यातून निघणारा काळा कुट्ट धूर म्हणजे विषारी वायू कार्बन मोनोऑक्साईड हवेत मिसळत आहे. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होत

एका गॅस सिलिडरचा दर हजाराच्या घरात व अव्वाच्या सव्वा झालेले पेट्रोल, डिझेलचे दर, लाकडाचे सरपण चारशे रुपये मण अशा वाढलेल्या महागाईने हे घेणे परवडत नाही. घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या याचा वापर चूल बंब पेटविण्यासाठी करत आहे.कोमल ज्ञानेश्वर ढोरे, गृहिणी, टाकवे बुद्रुक तालुका मावळ म्हणाल्या,”अलिकडील काळात ग्रामीण भागात प्लास्टिकचा वापर महिलांमार्फत घरी चूल व बंब पेटविण्यासाठी होऊ लागल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी वायूच्या घुराने महिलांमध्ये श्वसनाचे विकार वाढले आहेत. धुरामुळे सर्दी, दमा, खोकला, श्वसनाचे, डोळ्याचे आजार वाढले आहेत. या कोरोना काळात महिलांनी सकाळी चुली व बंब पेटविताना प्लास्टिकचा उपयोग न करता आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता बाळगण्यासाठी नाका तोंडाला मास्क, रुमाल लावणे आवश्यक आहे.

  • डॉ. श्रेयस टोम्प म्हणाले,”हा विषारी वायू व काव्य कुट्ट धूर यामुळे ग्रामीण, शहरी भागातील महिलांमध्ये श्वसनाचे विकार वाढत आहे.
  • धुराच्या अॅलर्जीचे आजार, डोळ्यांचे आजार उद्भवू लागले आहेत. महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. अजूनही बाजारात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लास्टिक बंदी ही फक्त कागदावर असून त्याच्या वापराबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
error: Content is protected !!