तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने निगडे ग्रामस्थांच्या वतीने भरत शेटे यांचा सत्कार
नवलाखउंब्रे:
मावळ तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने बधालेवस्ती येथील शिक्षक भरत शेटे सर यांचा निगडे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पं.स मावळचे मा.सभापती गुलाब म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम कदम,राष्ट्रवादी कॉग्रेसचे मा.कार्याध्यक्ष शिवाजी असवले,मा.सरपंच दत्तात्रय पडवळ,युवा नेते नवनाथ पडवळ,मावळ प्रबोधनीचे अध्यक्ष रविंद्र शेटे,पत्रकार रामदास वाडेकर,निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सविताभांगरे,अध्यक्ष संतोष भांगरे,शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे,पांडूरंग कोयते,रविंद्र कडलक,राजू भेगडे,सुनिल माकर,मिनीनाथ खुरसुले,शोभा गुप्ते इ.मान्यवर उपस्थित होते.
भरत शेटे सर हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी परीटवाडी व बधालेवस्ती शाळांचा भौतिक व शैक्षणिक कायापालट केलेला आहे.बधालेवस्ती शाळा ही मावळ तालुक्यातील पहिली आय.एस.ओ वस्तीशाळा असून येथील गुणवत्ता उल्लेखनीय आहे.यापूर्वी शेटे यांना शिवसेना पक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती,बधालेवस्ती यांजकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!