टाकवे बुद्रुक:
साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भाऊकाटकर यांची बिनविरोध निवड
झाली. उपसरपंच सोपान काटकरयांनी उपसरपंचपदाचा राजीनामादिला होता. काटकर यांचाउपसरपंचपदासाठी एकमेव अर्जदाखल झाल्याने उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.सरपंच पल्लवी रामदास वाघुले,
माजी उपसरपंच सोपान बापूरावकाटकर, सदस्या जयश्री हनुमंत.वाडेकर, अर्चना नितीन पिंगळे, मंदा सोपान गाडे, अश्विनी अतुलकाटकर, सुवर्णा दिलीप
काटकर,सदस्य विजय जाधव, ग्रामसेवकशरद ढोले,
रामदास वाघुले, पोलिस पाटील हनुमंत वाडेकर, नितीन पिंगळे उपस्थित होते.नवनाथ काटकर हे वयाच्या
२२ व्या वर्षी उपसरपंच पदावरविराजमान झाल्याने ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप पडली व पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरपंच भूषण असवले, माजी सरपंच रमेश पिंगळे,मा चेअरमन नंदू असवले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल असवले, शंकर पिंगळे, योगेश पिंगळे भाऊसाहेब काटकर यांच्या उपस्थितीत नवनाथ काटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!