लोणावळा :
भरधाव वेगात जाणा-या कारचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार कार्ला फाटा सोडल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनर खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्व प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्त, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर खाली आडकलेली गाडी व प्रवाशी यांना बाहेर काढले. वाहतूककोंडी झाली आहे.

error: Content is protected !!