टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मधील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय या विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधान उददेशिकाचे वाचन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक या ठिकाणी जमीन देणगीदार संतोष असवले यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले, तलाठी ऑफिस या ठिकाणी पोलीस पाटील अतुल असवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
विविध कार्यकारी सोसायटी चेरमन महादू गुणाट यांच्या हस्ते,न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनियर कॉलेज संस्थेचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे यांच्या हस्ते,
बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाळासाहेब पिंगळे यांच्या हस्ते,
प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी शैलेश साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सर्व पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व ठिकाणी ध्वजारोहण साजरा करण्यात आले.

error: Content is protected !!