वडगाव मावळ:
ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी अंतर्गत जांभूळ येथे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जल जीवन मिशन अंतर्गत दोन कोटी ७२ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचे भूमिपूजन सारीका सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
जांभूळ ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन सभापती कृषि व पशुसंवर्धन बाबुराव
वायकर यांच्या शुभहस्ते पार पडले.सभापती बाबुराव वायकर यांनी नूतनीकरणासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला,
यावेळी सरपंच नागसेन ओव्हाळ,उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे,माजी सरपंच संतोष जांभूळकर,
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर सुनील दंडेल,सुयश सांगळे,तृप्ती जांभुळकर, कल्पना काकरे,कुंदा खांदवे, स्नेहल ओव्हाळ,रूपाली गायकवाड,अमित ओव्हाळ,रखमाबाई भोईर,ग्रामसेविका कल्याणी लोखंडे,तुळशीराम जांभुळकर, व सर्व ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी व यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ग्रामपंचायत करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने आप्पांचे जाहीर असे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!