थंडीत हृदयाला जपा; लकव्याचा धोका.
आरोग्याकडे लक्ष द्या: डाॅ.विकेश मुथा
कामशेत:
थंडीचा कडाका वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होऊन आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे ज्येष्ठांसह विविध विकार असलेल्या व्यक्तींना हृदयविकार आणि लकव्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठांनो, थंडीत हृदयाला जपा लकव्याचा धोका वाढतो आरोग्याकडे लक्ष द्या असे आवाहन डाॅ.विकेश मुथा यांनी केले.
दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते, त्यात सर्वाधिक काळजी ह्रदयाची घेणे आवश्यक आहे. वयोवृद्ध नागरिकांच्या हृदयाचे ठोके सामान्य हिवाळ्यात थंडीमुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट रेट कमी असतो.अशा व्यक्तींनी अधिक काळजी करण्याची गरज आहे.
डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” काळजी करा घाबरू नका,
हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी बदाम आणि पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर आहे .आहारात काही प्रमाणात बदाम पिस्ता सेवन करावे.थंडीच्या दिवसांत सकाळच्या उन्हात काही वेळ घालवावा. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी फळांचे सेवन करावे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेजही होऊ शकतो. थंडीमध्ये गरम कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
माणसांच्या तुलनेमध्ये वाढतात किंवा कमी होतात. चक्कर येणे, डोके दुखणे, छातीमध्ये वेदना होणे, जबड्याला वेदना होणे, डोळ्यांना धूसर दिसणे यांसारख्या समस्या उद्भवत असतील, तर मात्र वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.थंडीमध्ये रक्त प्रवाह कमी होणे आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गोठतात. यामुळेच हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढते. ही समस्या टाळण्यासाठी शक्य असेल, तेवढा व्यायाम करा. दरोगापासून बचाव करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास रक्त घट्ट होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना हा धोका अधिक असतो. त्यामुळे संतुलित आहाराबरोबरच भरपूर पाणी प्यायला हवा. तसेच नियमित व्यायाम आणि उबदार कपड्यांचा वापर करावा. आंदर मावळ परिसरात तीन रुग्ण यावर सध्या उपचार घेत आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी याकडे डॉ.मुथा यांनी लक्ष वेधले .

error: Content is protected !!