
पुणे:
पुणे जिल्हा परिषद पुणे, पशुसंवर्धन विभाग मार्फत पुणे जिल्ह्यात फिरते २५ पशुचिकित्सालय (मोबाईल व्हॅन)चा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पोलीस ग्राउंड, शिवाजीनगर येथे संपन्न झाला.
यावेळी पवार यांनी नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत मदतीस पोहोचत असल्याने सभापती बाबुराव वायकर याचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती-बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजाताई , मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भारत शेंडगे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- डॉ.शिवाजी विधाटे उपस्थित होते.मावळ तालुक्यातील पशुविस्तार अधिकारी डॉ.अनिल मगर यांच्या कडे गाडीची चावी सुपूर्द करून सदर सोहळा पार पडला.
पशुधन आजारी पडल्यास, अचानक विषबाधा झाल्यास किंवा एखादी आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होवू शकते किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पशुवैद्यकास घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही अशा वेळेस सदरचे आजारी जनावर
दवाखान्यापर्यंत उपचारासाठी घेवून येण्यासाठी पशुपालकांना मोठा आर्थिक भूदंड सोसावा लागतो. प्रसंगी वेळेत उपचाराअभावी जनावराचा मृत्यू होवून पशुपालकास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम व डोंगराळ आहे सदरच्या भागात दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असून पशुपालकांना दवाखान्यापर्यंत आणणे शक्य होत नाही.
आपातकालीन प्रसंगी पशुवैद्यकार (डॉक्टर)त्याचेकडील दुचाकी वाहनाने पशुपालकापर्यंत पोहचावे लागते अशा प्रसंगी कित्येक पशुवैद्यकांचा गंभीर अपघात होवून दुखापत झालेली आहे. व काही पशुवैद्यकांना प्राण गमवावे लागलेले आहे. अशा दुर्गम व डोंगर भागातील पशुपालकांकडील पशुधनावर आवश्यक ते उपचार शस्त्रक्रिया वेळेवर व तातडीने करणेसाठी
जनावराचा जीव वाचविणेसाठी वेळेत प्रयत्न करणे यासाठी फिरते पशुचिकित्सालयामुळे सहज शक्य होईल.
अशी माहिती यावेळी सभापती बाबुराव वायकर यांनी देऊन पशुपालकांनी व शेतकरी बंधूनी १९६२ टोल फ्री क्रमांक वर कॉल करून या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
या मोबाईल व्हॅन सेवा प्रकार व प्राधान्य असे असणार आहे.
• इमर्जन्सी- (तातडीच्या सेवा)
अपघात, जाग्यावर पडणे ,कष्टमय प्रसूती ,मायांग बाहेर पडणे
• विषबाधा सर्पदंश / केमिकल इ.
• लक्षण सांगणारे आजार -दिवसभरात सेवा देता येणारे-
ताप ,डायरीया ,स्तनदाह ,कृ. रे ,जखम ,वेदना, अपचन ,दूध कमी.
यय•नियोजन करून सेवा देणे
गर्भ तपासणी,स्वास्थ दाखला,शस्त्र क्रिया, शवविच्छेदन ,खच्चीकरण ,फॉलो अप केसेस, जंतनाशके, लसीकरण, पोट फुग.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







