कै.उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय सांगिसे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कामशेत:
सांगिसे ता. मावळ येथील कै उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय या विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधान उददेशिकाचे वाचन करून गावचे सरपंच श्री.बबनराव टाकळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सरपंच श्री बबनराव टाकळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्व.संतोष परचंड प्रतिष्ठाणच्या वतीने शाळेस विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे व खाऊचे वितरण करण्यात आले.तसेच श्री सदाभाऊ गरूड यांच्या वतीनेही खाऊ वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रा. सदस्या चंदाताई पिंगळे, निवृत्तीभाऊ टाकळकर, संतोष पिंगळे, तसेच स्व.संतोष परचंड प्रतिष्ठाण दिपक परचंड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व सुत्रसंचलन श्री अंबादास गर्जे यांनी तर आभार श्री ज्ञानेश्वर अरनाळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी शिक्षक अनिल शिंदे,सविता शिंदे,दशरथ ढोरे,अमोल आल्हाट यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!