महर्षी कर्वे आश्रमशाळेत ७३ वा. प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कामशेत: महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत ता. मावळ जि. पुणे येथील आश्रमशाळेत आज सकाळी ठिक ८.०० वा. कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री. बाळासाहेब लोहकरे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे कार्यवाह) कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मीनल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. तुकाराम पवार यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये आश्रम शाळेतील इयत्ता दहावी कुमारी मनीषा डाखोरे हिणे आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी रवीना मोहिते व इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी समृद्धी कपडे यांनी ऑनलाइन भाषण केले. तसेच आश्रम शाळेच्या प्राथमिक शिक्षिका सौ. प्रेमकला वैभव पाठक यांनी २६ जानेवारी व संविधान यावर आपले विचार मांडले.
सदर कार्यक्रमास शाला समिती सदस्य श्री. धनंजय वाडेकर, श्री. विक्रमशेठ बाफना, श्री. संजय जोशी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोणावळा तालुका सहकार्य वाह) ग्रामस्थ श्री.नवनाथ ठाकर, श्री. युवराज शिंदे, श्री. हिरामण शिंदे, श्री. शंकर पिंगळे श्री. दिनेश कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व इयत्ता १० वीच्या विद्यार्थींनी व ऑनलाइन विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंढरीनाथ वाडेकर यांनी केले.

error: Content is protected !!