नवलाखउंब्रे:
नवलाखउंब्रे ग्रामपंचायतच्या वतीने अशोक धनोकार ,रूक्मिणी काळे , भरत शेटे यांचा सत्कार करण्यात आला. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे तील सहशिक्षक अशोक धनोकार यांचा सत्कार नवलाख उंब्रे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मावळ तालुका शिक्षक लोकशाही आघाडी च्या जिल्हा प्रतिनिधी रूक्मिणी काळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या विजया आप्पासाहेब शेटे यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच जि.प.प्राथमिक शाळा नवलाख उंब्रे गावातील, मावळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक भरत शेटे यांचा सत्कार विद्यमान उपसरपंच राहुल शेटे यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळ पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश शेटे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या विजया आप्पासाहेब शेटे,उषा दरेकर ,ग्रामसेवक सौ.घोडेकर, सोपानराव नरवडे माजी उपसरपंच, अश्विनी विशाल शेटे,माजी उपसरपंच मयुर नरवडे, हनुमंत कोयते. पांडुरंग कोयते. एकनाथ शेटे रविंद्र कडलक. संपत शेटे , नवनाथ पडवळ , सागर शेटे, विक्रम शेटे.समिर शेटे सर.विजय अरूण शेटे उपस्थित होते.तसेच श्रीराम विद्यालयातील सहशिक्षक विनय गायकवाड , युवराज सोनकांबळे , वैशाली माळी ,सुजाता चव्हाण , विकास ताजणे आणि ग्रामस्थ आजी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!