वडगाव मावळ:
प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सदर अभियानात नागरिकांचा सहभाग वाढीवण्यासाठी व नागरिकांना स्वच्छतेसंबधीत जागृत करण्यासाठी वडगाव नगरपंचायत वतीने शहरातील नगरपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन आदी परिसरात जनजागृती पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका नगरपंचायत शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!