प्रजासत्ताक दिनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाई वाटप
तळेगाव स्टेशन:
जगातील कोरोना महामारीचे संकट दूर जाऊन,नव चैतन्याची लकेर उठावी यासाठी प्रजासत्ताक दिनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रजासत्ताक दिनी झालेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गेल्या दोन वर्षां पासून जगाला कोरोनाच्या साथीने विळखा घातला आहे, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या जवळचे अनेकजण दगवल्याचे पाहिले होते.
गेली दोन वर्षे संपूर्ण जग लॉकडाऊन मुळे हतबल झाले होते.गेली दोन वर्षे कोव्हिडं काळात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे व त्यांचे कार्यकर्ते जीवाचे रान करून सर्वस्व पणाला लावून समाजसेवा व रुग्णसेवा करीत आहेत.
जगावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर निवळावे. जगामध्ये मानवी चैतन्य पुन्हा बहरून यावे या साठी जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी मिठाई वाटप केले. तळेगाव स्टेशन चौक
(ओसीया मेडिकल समोर),विरचक्र मंडळ चौक , यशवंत नगर,मराठा क्रांती चौक , सिंडिकेट बँक,जनसेवा वाचनालय , इंद्रायणी महाविद्यालया समोर,मनोहर नगर, बालाजी मार्बल समोर वाटप करण्यात आले.
जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे म्हणाले,”
मिठाई वाटप हे केवळ निमित्त असून कोव्हिड रुपी भस्मासुरचा वध व्हावा व पुन्हा जन जीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेली ही प्रार्थना आहे.जनसेवा विकास समितीच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!