तळेगाव स्टेशन:
आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जात आहे. तिरंगाध्वजाला अभिवादन करण्याचा आज दिवस. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणा-या हुतात्मांच्या बलिदानाचा स्मरणाचा आज दिवस. गतकाळातील इतिहासाच्या घटनांचा स्मरून नव्याने येणारी आव्हाने पेलण्याची शपथ आणि संकल्प घेण्याचा हा दिवस.
राष्ट्रीय सण असलेल्या प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करीत देशभक्तीचे गोडवे आपण सारेच गात असतो.अशाच देशभक्तीत न्हाऊन काढण्यासाठी तळेगाव स्टेशन येथील स्वप्ननगरीतील इमारतीला तिरंगी रंगाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
येथील सौरभ सावंत या तरूण कार्यकर्त्याच्या पुढाकारातून ही रोषणाई करण्यात आली आहे. सौरभ लाईटस् अॅन्ड डेकोरेटर मावळातील विविध इव्हेंट मध्ये आपली कला दाखवत असतो.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेला सोसायटीत केलेली विद्युत रोषणाईकडे सहज नजरा वळत आहे. सोसायटीत सभासदांकडून सावंत यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!