टाकवे बुद्रुक:
डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी वैजयंती सुभाष आलम यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या उपसरपंच संगिता पिंगळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच नामदेव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत उपसरपंच पदासाठी वैजयंती आलम यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
कांब्रे गावचे माजी पोलीस पाटील हाडकू रामभाऊ आलम यांची सूनबाई असलेल्या वैजयंती सुभाष आलम यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला.
७० वर्षांपूर्वी वैजयंती यांचे कुटूंबातील ज्येष्ठ सासरे यशवंत(म्हातारबुवा)आलम यांनी सरपंच पदाचा बहुमान प्राप्त केला त्यानंतर याच परिवारातील दत्तोबा आलम यांनी उपसरपंच पद भूषविले. सासरे हाडकू रामभाऊ आलम यांनी गावकारभारात २० वर्ष पोलीस पाटील म्हणून एक जबाबदारीने पदभार सांभाळला.
अनेक वर्षांपासून काही ना काही कारणावरून व आपापसातील तडजोडीने ग्रामपंचायत मधील संधी हुलकावणी देत होती,मात्र यंदाच्या निवडणुकीत हे यश खेचून आणण्यात यश मिळाले.
रामदास आलम,सुधीर आलम,अशोक आलम,दशरथ आलम,सुदाम आलम,भाऊसाहेब आलम,राजेंद्र देशमुख,दिलीप आलम,रामदास है.आलम,संतोष आलम,सोमनाथ शेलार,निवृत्ती शेलार,पोपट शेलार,दत्ता शेलार,बाळू जाधव,बाबू हिरवे, पांडुरंग ठिकडे या सर्वांनी पॅनल ची बांधणी करून कांब्रे,बोरवली,कांब्रे-पठार येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने विजय मिळवला.
सर्वांच्या अथक प्रयत्नाने नामदेव शेलार यांची हॅट्रिक सरपंच पदी निवड झाली तर त्यांच्या सोबत वैजयंती आलम, अंजना ठिकडे यांची बहुमताने निवड झाली.
मावळत्या उपसरपंच संगीता पिंगळे यांच्या नंतर वैजयंती आलम यांची निवड निश्चित मानली जात होती. या निवडी संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं असतान सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक पार पडली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या यशाबद्दल गावातील तरुण-युवकांनी जल्लोष साजरा केला असल्याचे समाधान सुभाष आलम यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!