मुंबई: 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा लोकनेते  शरद पवार साहेब  यांना कोरोनाची लागण झाल्याची पवार यांनी स्वत: ट्विट दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
पवार साहेबांचे ट्विट देशाच्या पंतप्रधानांनी वाचले आणि तातडीने पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन केला.
लोकनेते शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते.
पवार,होम क्वारंटाईन मध्ये असले तरी त्यांच्या तब्येतीची काळजी वाहणारा सारा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी असल्याच्या हजारो पोष्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. दस्तूरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी फोन करून चौकशी केल्यावर सर्वसामान्य कार्यकर्ता मागे कसा राहील. त्याने सोशल मिडियाचा आधार घेत पोष्ट टाकायला सुरुवात केली.
या सगळ्या पोष्ट मध्ये आमदार रोहीत पवार आणि पार्थ पवार या दोन नातवांच्या पोष्ट खूपच भावनिक असून सोशल मीडियावर या पोष्ट अधिक शेअर होत आहे.
आमदार रोहित पवार यांनी आजोबांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ट्विटरवर भावनिक पोस्ट केली. ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्विट ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत,’ असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनीही ट्विट करत आजोबांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘आजोबा काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल’
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार यांनी ट्विट करून म्हटलं.

error: Content is protected !!