प्रजासत्ताक दिनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाई वाटप
तळेगाव स्टेशन:
जगातील कोरोना महामारीचे संकट दूर जाऊन,नव चैतन्याची लकेर उठावी यासाठी प्रजासत्ताक दिनी तळेगाव स्टेशन भागात जनसेवा विकास समितीच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिली आहे.
भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ जानेवारी २०२२ ला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. दरवर्षी २६ जानेवारीला आपला ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करताना. आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन. १५ ऑगष्ट १९४७ ला आपल्याला स्वतंत्र मिळाले म्हणून या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.
देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमंलात आली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही राष्ट्रीय सण साजरे करताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. देशा बद्दलची श्रद्धा आणि निष्ठा या निमित्ताने कायमच अधोरेखित होती. या राष्ट्रीय सण समारंभाचे नव्या पिढीवर होणारे संस्कार भूषणावह आहे.
मात्र गेल्या दोन वर्षां पासून जगाला कोरोनाच्या साथीने विळखा घातला आहे, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या जवळचे अनेकजण दगवल्याचे पाहिले होते.
गेली दोन वर्षे संपूर्ण जग लॉकडाऊन मुळे हतबल झाले होते.गेली दोन वर्षे कोव्हिडं काळात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे व त्यांचे कार्यकर्ते जीवाचे रान करून सर्वस्व पणाला लावून समाजसेवा व रुग्णसेवा करीत आहेत.
जगावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर निवळावे. जगामध्ये मानवी चैतन्य पुन्हा बहरून यावे या साठी जनसेवा विकास समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी मिठाई वाटप केले जाणार आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून मिठाई चे वाटप तळेगाव स्टेशन चौक
(ओसीया मेडिकल समोर),विरचक्र मंडळ चौक , यशवंत नगर,मराठा क्रांती चौक , सिंडिकेट बँक,जनसेवा वाचनालय , इंद्रायणी महाविद्यालया समोर,मनोहर नगर, बालाजी मार्बल समोर येथे होणार आहे.
जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे म्हणाले,”
मिठाई वाटप हे केवळ निमित्त असून कोव्हिड रुपी भस्मासुरचा वध व्हावा व पुन्हा जन जीवन सुरळीत व्हावे यासाठी केलेली ही प्रार्थना आहे.जनसेवा विकास समितीच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केले.

error: Content is protected !!