वडगाव मावळ:
एसटी कामगारांचा विलगीकरण्यासाठी महाराष्ट्रभर सुरु असलेला संप या संपाचा परिणाम शहरी भागासह ग्रामीण भागात अधिक प्रमाणात जाणवत आहे, एसटी महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील बहुतांश गरीब नागरिकांचा कणा आहे . परिणामी ग्रामीण भागामधील पर्यायी साधन एसटी बस बंद असल्याकारणाने एसटी प्रवासावरती अवलंबून असणारे प्रवासी इतर वाहनाने प्रवास करताना त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे अतोनात हाल होत आहे.
दरम्यान मुक्कामी एसटी या मार्गाने तळेगाव,वडगाव मावळ, कान्हे फाटा,टाकवे बुद्रुक,फळणे फाटा, कोंडीवडे,भोयरे,कशाळ फाटा,किवळे,पिचडवाडी, कचाळणे, इंगळून,पारीठेवाडी, अनसुटे, कुणे, कुणेवाडी, माळेगाव खुर्द,पिपरी, माळेगाव बुद्रुक,सावळा,मेटलवाडी, गोंटेवाडी या 45 किलोमीटर अंतरावरामधील प्रवासी नागरिकांना घेऊन संध्याकाळच्या वेळी एसटी बस सावळा ह्या ठिकाणी मुक्कामी येत असत .
तसेच दुसर्‍या मार्गी तळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, टाकवे बुद्रुक, फळणे फाटा, दवणेवाडी, मोरमारवाडी, माऊ, वडेश्वर, शिंदे घाटेवाडी, नागाठली, वाहनगाव, कुसवली, बोरवली,कांब्रे, डाहुली, बिंदेवाडी,लालवाडी,कुसूर,खांडी,नीळशि या भागात पन्नास किलोमीटर अंतरावरती एसटी बस मुक्कामी येत असत.
परिणामी चालक व वाहक यांचे स्थानिक नागरिकांकडून जेवणाची व राहण्याची उत्तम प्रकारे सोय केली जात असत . त्या भागातील स्थानिक नागरिक व चालक वाहक त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे एक अतूट नाते निर्माण झाले होते.
परिणामी पहाटे एसटी याच मार्गी एसटी माघारी निघाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा,कॉलेज तसेच कामगार दुग्ध व्यवसायिक, शेतकऱ्यांना शेतीची अवजारे आणण्यासाटी शहरी भागात सोडत असे त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये वेळेवरती पोहचत व नागरिकांची कामे वेळेत होत असत.
दरम्यान संपामुळे वास्तविक पाहता एसटी महामंडळाला आपले अस्तित्व कायमस्वरुपी टिकवून ठेवता आले नाही.
दरम्यानच्या काळात राजकारणात आपले राजकीय भविष्य घडवू पाहत असणारे राजकीय पुढारी हे मतदार महिला – पुरुष यांना सहलीचे नियोजन करून आवर्जून अनेक ठिकाणी देवदर्शन पर्यटक ठिकाणी अशा अनेक वेगवेगळ्या भागात घेऊन जात असल्याचे सध्या स्थितीचे चित्र आहे.
दरम्यान एसटी बस संप सुरू आहे. परिणामी कोरोना काळामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शाळा, कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी येणारे शिक्षक, शेतकऱ्यांना शेतीच्या योजना पोहोचवण्यासाठी येणारे शासकीय अधिकारी, शेतीच्या कामासाठी लागणारे अवजारे शेतीची पेरणी साठी लागणारे बियाणे आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी भासत आहेत.
तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना औद्योगिक वसाहत टाकवे बुद्रुक तसेच शहरी भागांमध्ये midc मध्ये काम करण्यासाठी जावे लागत आहे.
दरम्यान महिलांसाठी गाडी प्रवासाची कुठलीही सुविधा करण्याच्या मनस्थितीत सध्या तरी कोणताही राजकीय पुढारी पुढाकाऱी दिसून येत नाही याची खंत वाटत आहे.
एसटी संप सुरू असल्यामुळे इतर वेगवेगळ्या वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ये – जा करत असताना त्या वाहनांची क्षमता नसताना सुद्धा बकऱ्या कोंबड्या सारखे प्रवासी नागरिक, महिलाना बसवले जात आहेत.
याकडे वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. परिणामी प्रवासामध्ये महिलांचे अतोनात हाल होत आहे.
अपघात होऊन एखादी मोठी घटना घडण्याच्या अगोदर याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या जीवघेण्या समस्येकडे अजून तरी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे किंवा शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उद्या काही अघटित घटना घडल्यास याला जबाबदार कोण ?
काही घटना घडल्यावरतीच राजकीय पुढारी व शासकीय अधिकारी यांना जाग येणार का ?असा प्रश्न विचारला जात आहे.
काही दिवसांपासून एसटी कामगारांचा विलगीकरणासाठी सुरू असलेला संप यामुळे आम्हाला शेहरी भागांमध्ये दूध पोचवण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, दरम्यानच्या काळामध्ये प्रामुख्याने लॉकडाऊन मध्ये वाढलेली महागाई त्यामध्ये वाढलेले पेट्रोल-डिझेल यामुळे स्वतःच्या गाडीने किंवा इतर दुसऱ्या वाहनांमधून दूध घेऊन जाण्यासाटी खूप अडचणी निर्माण होत आहे, त्यामुळे घर खर्च भागवायचा कसा? जनावरांसाठी लागणारे खाद्य उपलब्ध करायचे कसे ? खिशाला खूप मोठी चणचण भासत आहे.

error: Content is protected !!